Extramarital Affair: विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास, दोरी तुटली म्हणून महिला वाचली, एकाच मृत्यू
कधी संपर्कही नाही आला. पण दोघांनाही सोशल मीडिया वापरण्याची सवय. त्यातही फेसबुक काहीसे अधिक. फेसबुकच त्यांच्यात ठरला महत्त्वाचा दुवा. फेसबुकच्या माध्यमातू ओळख झाली. पुढे वाढली. मैत्री वैगेरे झाली. मात्रीही वाढली. प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांसाठी वेडेपिसे. व्याकूळ. प्रश्न एकच. आता पुढे काय?
Extramarital Affair: ती विवाहीता तीशीतली. तो अविवाहीत. वय वर्षे सत्तावीस. ती ठाण्याजवळील कल्याण येथे राहणारी. तो बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यातील भेंड बुद्रुक ( Bhend Budruk) इथला. दोघांमध्ये कसलीच ओळख नाही. कधी संपर्कही नाही आला. पण दोघांनाही सोशल मीडिया वापरण्याची सवय. त्यातही फेसबुक काहीसे अधिक. फेसबुकच त्यांच्यात ठरला महत्त्वाचा दुवा. फेसबुकच्या माध्यमातू ओळख झाली. पुढे वाढली. मैत्री वैगेरे झाली. मात्रीही वाढली. प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांसाठी वेडेपिसे. व्याकूळ. प्रश्न एकच. आता पुढे काय?
दोघांनी तोडगा काढला. ठरलं. भेटायचे. काहीही होऊ देत. प्यार किया तो डरना क्या? ती निघाली, कल्याणहून. अगदी त्याच्या घरी पोहोचली. थेट भेंड बुद्रुक येथे. दरम्यान, ती घरी नसल्याचा पत्ता पतीला लागला. पतीने फोन केला. तीने सांगितले. आता परतणे शक्य नाही. पती म्हणाला ''मी जातो पोलिसांत. करतो एफआयआर''. दोघांपुडेही पेच. आता पुढे काय? (हेही वाचा, Suicide Case: पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीची आत्महत्या, आरोपी अटकेत)
'जगावं की मरावं' हा एकच प्रश्न दोघांसमोर. दोघांनी मिळून दुसरा पर्याय निवडला. मरायचं. तेही सोबतच. दोघांनी ठरवलं गळफास घ्यायचा. जे ठरवलं ते त्यांनी केलं. घराच्या आड्याला दोघांनीही गळफास घेतला. पण जसं ठरवलं तसं घडलं नाही. दोर तुटला. त्याच्या जीवनाचा. तिच्या गळफासाचा. ती वाचली. मेलीच नाही. त्याला मात्र फास लागला. तो तर गेला. ती मात्र जीवंत. तिच्यासमोर प्रश्न कायम. आता पुढे काय?
प्राप्त माहितीनुसार, माहिती कळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा करुन तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधिकारी एम. डी. कुवारे हे या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नलघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. जयपाल लक्ष्मण वाव्हळ ( वय 27 , रा. भेंड बुद्रुक, ता.गेवराई ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिलेचे नाव कळू शकले नाही.