Beed Crime News: बीड मधील धक्कादायक प्रकार! लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विष पाजले, आरोपीवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला विषारी औषध पाजण्यात आले आहे.

Beed Crime News: बीड मधील धक्कादायक प्रकार!  लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीला विष पाजले, आरोपीवर गुन्हा दाखल
Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Beed Crime News: बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला विषारी औषध पाजण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार अल्पवयीन मुलीवर आरोपीने अनेकदा अत्याचार केले होते.  आठ दिवसांपूर्वी आरोपीने पीडित मुलीला विषारी औषध पाजले होते. या घटनेअंतर्गत पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काही दिवसांपूर्वी फरार झाला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला एक वर्षापासून जिवे मारण्याची धमकी देत होता. धमकी देवून आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक छळ करत होता. ही घटना आष्टी तालुक्यातील एका गावात घडली. रविवारी पोलिसांनी फरार आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीने 7 ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास मुलीवर पुन्हा बळजबरी अत्याचार केला. मारण्याची धमकी देत तीला विषारी औषध पाजले. पीडितेने  हा सर्व प्रकार पोलिसांत सांगितला.

 

आरोपी फरार असल्याची माहिती मिळताच, पोलीसांनी गावात बंदोबस्त लावला होता. एका खबरीनुसार पोलीसांनी आरोपीला गावाच्या मंदीरा जवळ पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेअंतर्गत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).