Beed Crime News: जमिनीचा वाद पेटला, पाच मामांनी घेतला भाच्याचा जीव; बीड मधील घटना
जमिनीच्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अंबाजोगाई येथील मोंढा परिसरात एका तरुणाची हत्या झाली आहे.
Beed Crime News: अनेकदा कुटुंबात जमिनी संदर्भात वाद होत असतो, आता पर्यंत अनेक अश्या घटना ऐकल्या ज्यानी अंगावर काटा आला आहे, दरम्यान अशीच एक घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडला आहे. जमिनीच्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अंबाजोगाई येथील मोंढा परिसरात एका तरुणाची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणाच्या पाच मांमानी जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृणपणे जीव (Murder) घेतला आहे. आरोपी मामांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा-मराठवाडा मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती)
मारहाणीत मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र श्रीराम कळसे (३७) महसूल कॉलनी असं मृत तरुणाचे नाव आहे. तर माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड असं आरोपींचे नाव असून यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. भर दिवसा मामांनी तरुणाला काठीनं मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्य झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी शोककळा पसरली.
राजेंद्र आणि त्याच्या मामांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सूरु होता. याच गोष्टीचा राग मनात धरात टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे. भरदिवसा परिसरात राजेंद्र उभा असताना सर्व जणांनी राजेंद्राला घेरलं सुरुवातीला त्याच्यावर बाचाबाची झाली. त्यानंतर एकाने दगडाने मारलं आणि काठीने देखील मारहाण केली. या घटनेत त्याचं डोकं फुटलं. तो जमिनीवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडून राहिला. घटना पाहून स्थानिकांनी धाव घेतला. त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबियांना दिली.
या घटनेनंतर कुटुंबातील सदस्याने आणि आशा कळसे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेअंतर्गत पुढील तपास करत आहे. परिसरात या घटनेनंतर सर्वांना धक्काच बसला आहे.