Bhagirath Biyani Suicide: बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणींनी संपवलं जीवन, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड भाजपच्या (BJP) शहराध्यक्षांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. आज सकाळी त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना समजताच त्यांनी तातडीने हॉस्पिटल गाठले. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागे राजकीय किंवा कौटुंबिक कारण आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हेही वाचा Shiv Sena Symbol Row: शिंदे गटाकडून 'मशाली' ला टक्कर देण्यासाठी सूर्य, पिंपळाचं झाड, ढाल-तलवार 3 नव्या चिन्हांचा पर्याय सादर
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.