Beautification and Cleanliness Competition: राज्यात सुशोभीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये नवी मुंबई, पनवेल व ठाण्याने मारली बाजी
या पुरस्काराचे श्रेय नवी मुंबईकरांना देताना नार्वेकर म्हणाले, ‘नागरिक संस्थेने घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात रहिवाशांनी दाखविलेल्या सक्रीय सहभागामुळे आणि आस्थामुळे हा सर्वोच्च सन्मान शक्य झाला आहे.’
महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेल्या राज्यव्यापी नागरी विकास स्पर्धेत नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलने बाजी मारली आहे. ही स्पर्धा शहराच्या सुशोभिकरण आणि स्वच्छतेवर (Beautification and Cleanliness Competition 2022) आधारित होती. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि पनवेल महानगरपालिका (PMC) यांनी आपापल्या श्रेणींमध्ये प्रथम, तर ठाणे महानगरपालिका (TMC) द्वितीय क्रमांक पटकावला. गुरुवारी, 20 एप्रिल रोजी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एनएमएमसी आयुक्त राजेश नार्वेकर आणि पीएमसी आयुक्त गणेश देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना प्रशस्तीपत्र आणि 15 कोटी रुपये देण्यात आले. नवी मुंबईने सर्व क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि ओडीएफ श्रेणीमध्ये सर्वोच्च ‘वॉटर प्लस’ ग्रेड आणि कचरामुक्त शहरांच्या श्रेणीत पंचतारांकित प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
या पुरस्काराचे श्रेय नवी मुंबईकरांना देताना नार्वेकर म्हणाले, ‘नागरिक संस्थेने घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात रहिवाशांनी दाखविलेल्या सक्रीय सहभागामुळे आणि आस्थामुळे हा सर्वोच्च सन्मान शक्य झाला आहे.’ (हेही वाच: रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने गावाला केलं प्रदुषणमुक्त; राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने गौरव)
स्वच्छतेसोबतच भिंतींवर चित्रकला, पुनर्वापर केलेल्या वस्तूंपासून बनवलेली शिल्पे, कारंजे, भिंतींवर कविता इत्यादी सर्जनशील संकल्पनांचा वापर करून शहराच्या सुशोभिकरणासाठी नागरी संस्थेने खूप प्रयत्न केले आहेत. हे केवळ मुख्य चौक आणि सार्वजनिक भागातच नव्हे तर संपूर्ण शहरात हे करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या सुशोभिकरणाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. दुसरीकडे, पनवेलने आपल्या दीर्घकालीन जलसाठा योजनेनुसार वडले तलावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संवर्धन आणि सुशोभीकरण पूर्ण केले. या पुरस्कारामुळे शहराला राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)