Baramati Accident News: बारामती येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू; कारचा टायर फुटल्याने घटना
बारामती (Baramati News) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर (Baramati National Highway) झालेल्या अपघातात (Fatal Accident) एका काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आदित्य निंबाळकर (Abasaheb Nimbalkar) असं मृत तरुणाचं नाव आहे. कारचा टायर फुटल्याने (Car Tire Burst)हा अपघात झाला.
बारामती (Baramati News) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर (Baramati National Highway) झालेल्या अपघातात (Fatal Accident) एका काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आदित्य निंबाळकर (Abasaheb Nimbalkar) असं मृत तरुणाचं नाव आहे. कारचा टायर फुटल्याने (Car Tire Burst) ही घटना घडली. आदित्य हा इंदापूर येथील काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर (Abasaheb Nimbalkar) यांचा मुलगा आहे. कारचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. अपघात इतका भयावह होता की, त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.
कारचा टायर फुटला
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. आदित्य निंबाळकर हा त्याच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरुन काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत निघाला होता. त्याची कार रुई पाटीजवळून निघाली असता त्याच्या कारचा टायर फुटला. अपघात इतका मोठा होता की, टायर फुटल्याचा आणि कार आदळल्याचा आवाज परिसरात पोहोचला. आवाज ऐकून गावकरी आणि स्थानिक नागरिक आवाजाच्या दिशेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. त्यांनी कारमध्येच जखमी अवस्थेत अडकलेल्या आदित्य यास कारमधून बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. मात्र, त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (हेही वाचा, Speeding Car Plunges Off Garware Bridge: पुण्यातील डेक्कन परिसरात भरधाव कार गरवारे पुलावरून घसरली, चालक किरकोळ जखमी (Watch Video))
कार इमारतीवर आदळली
काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीच्या दिशेने निघाला होता. त्याची कार वेगात होती. दरम्यान, त्याची कार रुई पाटीवर आली असताच कारचा टायर फुटला. टायर फुटताच कार पलटी झाली आणि रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीच्या कोपऱ्यावर जाऊन आदळली. या घटनेत कारचा चक्काचूर झाला. याच कारमध्ये आदित्य अडकून पडला. स्थानिक जेव्हा त्याच्या मदतीसाठी पोहोचले तेव्हा तो कारमध्ये जखमी अवस्थेत आढळून आला.
पाठिमागील काही दिवसांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये तरुणाईचा समावेश अधिक आहे. पुढे जिल्ह्यात अलिकडेच दोन अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगाने कार चालवत केलेल्या अपघातात (हिट अँड रन) दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबई येथीलही एका घटनेत अल्पवयीन मुलाचा समावेश आढळून आला. तर मुंबई येथेही हीट अँड रन प्रकरणात विशीतील तरुणाचा समावेश आढळून आला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)