Bank of Maharashtra Update: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुमचे खाते आहे? तर मग ही बातमी वाचाच
बँक विलिन होत असताना ग्राहकांच्या ठेवी, कर्ज रकमा, बचती अशा सर्व प्रकारच्या गुंतवणुकीही नव्या बँकेकडे वर्ग होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ग्राहकांना त्रास संभवत नाही.
देशभरातील अनेक हलक्या, मध्यम आणि विस्तारीत रुप असणाऱ्या अनेक बँकांचे विलिकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि लोकप्रिय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) या बँकेचेही पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलिनिकरन केले जाणार असल्याचे वृत्त आहे. CNBC आवाज च्या हवाल्याने प्रसारामध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलाहाबाद बँक (Allahabad Bank) लवकरच पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिन केली जाऊ शकते. या संभाव्य विलिनिकरणाबाबत लवकरच एक प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटमध्ये येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विजया बँक आणि देना बँक यांचे नुकतेच विलिनिकरण झाले आहे. दरम्यान, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), यूनियन बँक (UB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या विलिनिकरणाबाबतही चर्चा सुरु आहे.
दरम्यान, कोणत्याही बँकेचे विलिनिकरण झाल्यास बँक ग्राहक आणि खातेदारांसाठी काही गोष्टी अडचणीच्या होतात. जसे की, ग्राहकांना विलिन झालेल्या बँकेचे चेकबुक, पासबुक बदलून घ्यावे लागते. तसेच, ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार, तसेच एटीएम व्यवहारांसाठी आवश्यक ठरत असलेले एटीएम कार्डही नव्याने बदलून घ्यावे लागते. बँक पासबुक(Bank Passbook), चेक बुक ( Bank Checkbook), एटीएम (ATM)अशा सर्वच गोष्टी ग्राहकाला नव्याने घ्याव्या लागतात. (हेही वाचा, ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेस ऑनलाईन हॅकींगद्वारे 1 कोटी 55 लाख 95 हजार रुपयांचा गंडा)
दरम्यान, कोणत्याही बँकेचे कोणत्याही बँकेत विलिनिकरण झाले तरी, ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. बँक विलिन होत असताना ग्राहकांच्या ठेवी, कर्ज रकमा, बचती अशा सर्व प्रकारच्या गुंतवणुकीही नव्या बँकेकडे वर्ग होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ग्राहकांना त्रास संभवत नाही.