Bank Jobs in Maharashtra: बँक ऑफ इंडिया कोल्हापूर, सांगली येथे पदभरती, जाणून घ्या पद, पद संख्या, वेतन आणि निवड प्रक्रिया

ही भरती कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी (Bank Jobs in Maharashtra) होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (File Photo)

बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली (Bank of India Kolhapur and sangli) येथे पदभरती होणार आहे. ही भरती कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी (Bank Jobs in Maharashtra) होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी किमान शैक्षणिक आर्हता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणार आहे. पदांसाठी अर्ज करण्याची तारखी, पदांचा तपशील (Bank Jobs Post), वेतन (Bank Jobs Salary), अर्ज करण्याची पद्धत यांविषयी सविस्तर घ्या जाणून.

पदाचे नाव आणि एकूण जागा

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एकूण जागा 03, परिचर (Attendant) - एकूण जागा 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदासाठी अर्ज करु इच्छिणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पदवीपर्यंत पदवीधर असल्यास उत्तम. उमेदवारास संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक. उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पूर्ण झालेले असावे. बँक व्यवहार आणि बँक खात्यातील व्यवहारांची उमेदवारांना पुरेशी माहिती असायला हवी. (हेही वाचा, Pune: 300 कोटी रुपयांच्या घोट्याळ्याप्रकरणी वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास)

अर्ज भरण्याची पद्धत आणि अंतिम तारीख

पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.

वेतन

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) पदासाठी निवड पूर्ण झालेल्या उमेदवारंना प्रतिमहिना 15,000 रुपये तर परिचर (Attendant) - या पदांसाठी निवड पूर्ण झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना 8,000 रुपये इतके वेतन प्रति महिना या तत्वावर मिळणार आहे.

निवडप्रक्रिया

उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. लेखी परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत यात पूर्ण क्षमतेने उत्तीर्ण उमेदवारांची निवड केली जाईल.

उमेदवारांनी अर्जासोबत जोडण्याची आवश्यक कागदपत्रं

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

वरील पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा. त्यासाठी पत्ता- बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. उमेदवारांनी सदर पत्त्यावर अर्ज करण्याची अंतीम तारीख - 20 डिसेंबर 2021 अशी आहे.