Bank Holidays in October 2019: पुढच्या महिन्यात तब्बल 11 दिवस बँका असणार बंद; वेळेत उरकून घ्या पैशांची कामे
ऑक्टोबरमध्ये तुम्ही जर का बँकांची कामे करणार असाल तर आधीच सर्व प्लानिंग करा नाहीतर ऐनवेळी खोळंबा होण्याची शक्यता आहे.
श्रावण सुरु झाल्यानंतर सण-उत्सव यांच्यासोबत रेलचेल असते सुट्ट्यांची. विशेषतः सरकारी ऑफिसेस किंवा संस्था यांना सर्व शासकीय सुट्ट्या मिळतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे फार चंगळ असते. या सुट्ट्यांमुळे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँक बंद (Bank Holidays) राहणार आहेत. याच महिन्यात दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे सण येत आहेत, त्यामुळे या काही दिवस शासकीय कार्यालयेही बंद राहणार आहेत. ऑक्टोबरमध्ये तुम्ही जर का बँकांची कामे करणार असाल तर आधीच सर्व प्लानिंग करा नाहीतर ऐनवेळी खोळंबा होण्याची शक्यता आहे.
जाणून घेऊया ऑक्टोबर 2019 मधील बँकांच्या सुट्ट्या –
> ऑक्टोबरमधील पहिली सुट्टी असणार आहे बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी. या दिवशी गांधी जयंती असल्याने बँका बंद असणार आहेत.
> त्यानंतर 6 ऑक्टोबर रविवार, 7 ऑक्टोबरला रामनवमी, 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.
> पुढे 12 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार, तर 13 आणि 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
> दिवाळी काळात बँकांना चार दिवस सुट्टी असणार आहे. (हेही वाचा: Kanya Pujan 2019 Date: शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी दिवशी कन्या पूजन करण्याचं महत्त्व, शुभ वेळ काय?)
26 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार तर 27 ला रविवार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँक बंद राहतील.
या महिन्यातही सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बँकांनी आपला संप मागे घेतल्यानी ही परिस्थिती टळली. मात्र पुढच्या महिन्यात सर्व सरकारी सुट्ट्या असल्याने बँका 11 दिवस बंद राहणार आहेत.