Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबे याची पोलीस कोठडी 28 एप्रिल पर्यंत कायम
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही वांद्रे परिसरात 14 एप्रिल रोजी हजारोंच्या संख्येने विविध समुदायातील नागरिकांनी वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले होते.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही वांद्रे परिसरात 14 एप्रिल रोजी हजारोंच्या संख्येने विविध समुदायातील नागरिकांनी वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले होते. त्यावेळी एवढी अचानक गर्दी कशी झाली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ऐवढेच नाही तर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार सुद्धा केला होता. परंतु या सर्व घटनेच्या प्रकरणी आरोपी विनय दुबे याने नागरिकांना चिथावणी देणारी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे विनय दुबे याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर केल्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तर आता दुबे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून ती 28 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विनय दुबे याने सोशल मीडियात विनय दुबे याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करुन कामगार वर्गाला भडकवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच त्याला वांद्रे कोर्टात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाती आणखी 10 जणांना सुद्धा येत्या 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.(Palghar Mob Lynching प्रकरणी 8 तासांत 101 जण ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केली आरोपींची यादी)
Mumbai: Police custody of accused Vinay Dubey has been extended till April 28. He was arrested in connection with the gathering at Bandra on 14th April. #CoronavirusLockdown
— ANI (@ANI) April 24, 2020
दरम्यान, वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तसेच विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली होती. या प्रकरणी संताप ही सोशल मीडियात व्यक्त करण्यात आला होता. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2020 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

