Ban On Adult Content: ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मनसेची मागणी
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण स्वातंत्र्यांच्या नावाखाली अश्लील, विभत्स आणि मर्यादा ओलांडणारी दृष्ये दाखवली जात असून ती संतापजनक असल्याचे अविनाश जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणारी अश्लीलता महिला अत्याचारांना आणि विकृती पसरवण्यास जबाबदार असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओटीटीवरील वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या बाबत मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. (हेही वाचा - MNS Leader Avinash Jadhav: 'राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर घरात घुसून मारू', मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाकरे गटाला इशारा (Watch Video))
ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर सेन्सॉर लावला पाहिजे, असं मत अविनाश जाधव आणि महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण स्वातंत्र्यांच्या नावाखाली अश्लील, विभत्स आणि मर्यादा ओलांडणारी दृष्ये दाखवली जात असून ती संतापजनक असल्याचे अविनाश जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. भावी पिढीवरील संस्कार मोडीत काढण्याचे षडयंत्र काही ठाराविक निर्मिती संस्था, निर्माते आणि वाहिन्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
नेटफ्लिक्स , प्राईम टाईम, हॉट स्टार, आल्ट बालाजी यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक निर्बंध आणण्याची मागणी मनसेने केली आहे. ओटीटी वरील अश्लील वेब सीरीजवर सरकारने बंदी न घातल्यास नेटफ्लिक्स,बालाजी सारख्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयांवर घेराव घालण्याचा इशारा मनसेने दिला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका, चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड असावा अशी मागणी करण्यात आली होती. काही महिन्यापूर्वीच बिग बॉस ओटीटीवरील कंटेंटवरूनही वाद निर्माण झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

