Bakri Eid 2025: यंदाच्या बकरी ईदसाठी ठाणे पोलिसांनी जारी केले कल्याणसाठी वाहतूक निर्बंध; जाणून घ्या प्रवेश बंद रस्ते व पर्यायी मार्ग

सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना 7 जून 2025 किंवा 8 जून 2025 रोजी 'बकरी ईद' (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. सदर अधिसूचना फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

Bakri Eid 2025: यंदाच्या बकरी ईदसाठी ठाणे पोलिसांनी जारी केले कल्याणसाठी वाहतूक निर्बंध; जाणून घ्या प्रवेश बंद रस्ते व पर्यायी मार्ग

ईद-उल-अदा किंवा कुर्बानीचा सण म्हणून ओळखला जाणारा, बकरी ईद (Bakri Eid 2025) हा इस्लाम धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या धुल हिज्जा महिन्याच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. 2025 मध्ये, भारतात हा सण 7 जून रोजी साजरा होण्याची शक्यता आहे, जी तारीख चंद्रदर्शनावर अवलंबून आहे. हा सण प्रेषित इब्राहिम यांच्या अल्लाहच्या आज्ञेला समर्पित असलेल्या त्याग आणि विश्वासाची आठवण करतो. यंदाच्या बकरी ईदनिमित्त ठाणे शहर पोलिसांनी कल्याण उपविभागासाठी सविस्तर वाहतूक सूचना जारी केल्या आहेत. कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मेळाव्याची अपेक्षा आहे, विशेषतः दुर्गाडी ईदगाह येथे, जिथे मुस्लिम समुदाय ईदची नमाज अदा करतो.

तसेच त्याच दिवशी व त्याचवेळी शिवसेना पक्ष तर्फे दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गामाता मंदिरात घंटानाद कार्यक्रम केला जातो. सदर वेळी हिंदु कार्यकर्त्यांना लाल चौकी - दुर्गामाता चौक दरम्यान रस्त्यावर बॅरीकेटींग करुन अटकाव केला जातो. सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी, लाल चौकी आणि दुर्गा माता चौक दरम्यान वाहतूक प्रतिबंधित करण्यात येईल. पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी कल्याण शहरासाठी वाहतूक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत बकरी ईदचा सण 7 जून किंवा 8 जून रोजी (चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) साजरा केला जाईल आणि सदर परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवेशद्वार बंद केले जातील आणि सल्ल्यानुसार पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जातील.

वाहतूक मार्गदर्शक तत्वे-

प्रवेश बंद- कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदर वाहने लालचौकी येथून उजवे वळण घेवून आधारवाडी चौक-वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद- भिवंडीकडून कल्याण शहरातील आग्रा रोड मार्गे व गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदर वाहने दुर्गामाता चौक येथून डावे वळण घेवून वाडेघर सर्कल- आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद- कल्याण (पूर्व) कोळसेवाडी बाजूकडून गोविंदवाडी बायपास मार्गे दुर्गामाता चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदर वाहने पत्रीपूल-शिवाजी चौक-लाल चौकी येथून उजवे वळण घेवून आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. (हेही वाचा: Eid al-Adha 2025 History, Significance: भारतामध्ये 7 जून 2025 रोजी साजरा होईल ईद अल-अधा म्हणजेच बकरी ईदचा सण; जाणून घ्या या दिवसाचा इतिहास व महत्त्व)

प्रवेश बंद- कल्याण शहराअंतर्गत दुर्गाडी चौक-गोविंदवाडी बायपास पत्रीपूल मार्गे व दुर्गाडी चौक-शिवाजी चौक-पत्रीपूल मार्गे जाणाऱ्या कंटेनर,  ट्रेलर, मल्टीएक्सल, जड, अवजड वाहनांच्या वाहतूकीस 'बकरी ईद' चे दिवशी दिवसा व रात्रौ सर्व वेळांत 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

कल्याणसाठी वाहतूक निर्बंध:

सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना 7 जून 2025 किंवा 8 जून 2025 रोजी 'बकरी ईद' (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. सदर अधिसूचना फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 03:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).