Pandharinath Phadke: बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती.
राज्यात गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाहा पंढरीशेठ यांचा व्हिडिओ -
पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे.
त्यांना संपुर्ण राज्यात आदराने पंढरीशेठ असे म्हणत. महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झालं. पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे.