Pune Vedant Agarval Accident Case: पुणे अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाला जामीन मंजूर, नेमक्या अटी काय?

या अपघातात बड्या उद्योजकाचा मुलगा वेदांत अग्रवाल दोषी होता. या अपघात प्रकरणात आता त्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

Photo Credit -X

Pune Vedant Agarval Accident Case: पुण्यातील कोरेगाव पार्क(Korgaon Park accident)परिसरात शनिवारी १९ मे रोजी रात्री अडीच वाजताच्या दरम्यान, एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल(Vedanta Aggarwal)चालवत होता. या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. सर्व स्तरातून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना आरोपीला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला आहे. आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने अटी शर्तींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (हेही वाचा:Pune Hit And Run Case: पुण्यात पोर्शे कारने घडक देत दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन चालकाला जामीन )

शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच त्या तरूण-तरूणीचा मृत्यू झाला. ज्या अटींवर त्याला जामीन दिला. त्या अटींमध्ये 15 दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत वाहतूक नियंत्रण आणि त्याशिवाय अन्य गोष्टी कराव्या लागणार आहेत.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथून टू-व्हीलवर एक कपलजात होत. त्यावेळी वेदांत अग्रवालच्या स्पोर्ट्स कारने त्यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तरूणी गाडीवरून 10 फूट हवेत उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरूणाचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाला. दोघेही मुळचे राजस्थानचे होते. अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोणत्या अटींवर जामीन मंजूर

वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार या अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे.