Baba Siddique Last Rites: भर पावसात बाबा सिद्दिकींना अखेरचा निरोप, मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार

त्यांचे कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर देखील दु:खा चा डोंगर कोसळलाय.

Baba Siddique Last Rites: ज्येष्ठ राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी संध्याकाळी मुंबईत सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने राजकीय आणि मनोरंजन या दोन्ही उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे.  दरम्यान आज (दि.13) त्यांचा करण्यात आला. बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आलाय. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर हजारो लोकांकडून 'नमाज ए जनाना'प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांना आपल्या बाबांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले.  (हेही वाचा - Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा )

तत्पूर्वी त्यांच्या वांद्रे पाली हिल येथील निवासस्थानी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चित्रपट तारे तसेच राजकारणी मंडळींची गर्दी झाली होती. या नेत्यांना बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र सलमान खान यांच्यासह अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसोबत दिसले.  सिद्दिकी यांच्या वांद्रतील घराबाहेर आज फार मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली होती. त्यांचे कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर देखील दु:खा चा डोंगर कोसळलाय.

दरम्यान या प्रकरणात लॉरेंन्स बिश्नोई गँगचा जो रोल आहे, त्याबाबतही चौकशी करत आहोत. बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून घटनेनंतर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाशी संबधित आणखी दोघांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.