Aurangabad: खेळण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य

एका 5 वर्षीय मुलीवर 15 वर्षीय मुलाने विकृत कृत्य केल्याची संतापजनक घटना औरंगाबाद येथून समोर येत आहे. आरोपी मुलगा पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात.

Aurangabad: खेळण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

एका 5 वर्षीय मुलीवर 15 वर्षीय मुलाने विकृत कृत्य केल्याची संतापजनक घटना औरंगाबाद (Aurangabad) येथून समोर येत आहे. आरोपी मुलगा पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडितेला सायकल खेळण्याचा बहाणा करत दुसऱ्या कॉलनीत घेऊन गेला आणि त्याठिकाणी मुलीसोबत विकृत कृत्य केले. सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे ही घटना उघडीकस आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला. याप्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना औरंगाबाद शहराच्या गारखेडा परिसरात घडली. 5 वर्षीय पीडित मुलगी सोमवारी साडे चारच्या सुमारास अपार्टमेंटसमोर सायकल खेळत होती. त्या दरम्यान त्याच परिसरात राहणारा 15 वर्षीय आरोपी मुलगा तेथून फिरत होता. आरोपीनं पीडित मुलीला सायकल खेळण्याच्या बहाण्याने गोड बोलून सायकलवर बसवलं आणि तिला शेजारच्या कॉलनीत घेऊन गेला.

त्यानंतर आरोपी पीडित मुलीला दोन वाहनांच्या मध्ये घेऊन गेला आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी समोरुन येणाऱ्या महिलेला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. मात्र आपल्यासोबत काहीतरी विचित्र पीडित मुलगी घाबरली आणि तिने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या वडिलांनी मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. (Pune Shocker: 11 वर्षीय मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत)

या घटनेची माहिती मिळताच मुलाच्या वडीलांना प्रथम विश्वासच बसला नाही. मात्र पोलिसांनी संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्यांनाही जबर धक्का बसला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2021 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).