Aurangabad Man Swallows Toothbrush: तरुणाने गिळला टूथब्रश, घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन काढला बाहेर
त्याच्या पोटातून बाहेर काढलेली वस्तू टूथब्रशच होती. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती ठिक आहे. त्याने टूथब्रश गिळलाच कसा आणि का या प्रश्नाची उत्तरे मात्र अनुत्तरीतच आहेत. धक्कादायक असे की हा टूथब्रश साधा नव्हता तर चक्क अर्धा फूट लांब (6 इंच) होता.
औरंगाबाद (Aurangabad ) शहरातील एका पठ्ठ्याने चक्क टूथब्रश (Toothbrush) गिळला. आतापर्यंत आपण लहान मुलांनी टाचण्या, पिना, गोट्या बटण, बॅटरीचा सेल अथवा तत्सम वस्तू गिळल्याचे ऐकले असेल. पण, 33 वर्षीय तरुणाने टूथब्रश गिळल्याचे ऐकले आहे काय? नाही ना! पण औरंगाबाद येथे असे घडले आहे. एका तरुणाने चक्क टूथब्रश गिळल. अखेर त्याच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात (Ghati Hospital in Aurangabad ) शस्त्रक्रिया करुन हा ब्रश बाहेर काढण्यात आला. औरंगाबाद शहरात या प्रकाराची भलतीच चर्चा सुरु आहे.
तरुणाचे नाव समजू शकले नाही. या तरुणाने टूथब्रश गिळला. त्यानंतर त्याला त्याच्या पोटात काही टोचत असल्याचे जाणवले. सुरुवातीला त्याने दूर्लक्ष केले. पोटात कमालीच्या वेदना सुरु झाल्या. सुरुवातीला त्याने त्या सहन केल्या. काही वेळाने त्या वेदना असहय्य झाल्या. आता त्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लख नव्हता. त्याने जाऊन डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी तपासले असता त्याच्या पोटात काहीतरी लांब वस्तू असल्याचे जाणवले. डॉक्टरांनी एक्सरे काढला असथा पोटात टूथब्रश सदृश्य वस्तू असल्याचे आढळले. (हेही वाचा, Coin Removed From Nose After 50 Years: तब्बल 50 वर्षानंतर व्यक्तीच्या डाव्या नाकपुडीतून काढले नाणे, पहा हैराण करणारा व्हिडिओ)
डॉक्टरांनी सिटीस्कॅन करुन शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातून बाहेर काढलेली वस्तू टूथब्रशच होती. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती ठिक आहे. त्याने टूथब्रश गिळलाच कसा आणि का या प्रश्नाची उत्तरे मात्र अनुत्तरीतच आहेत. धक्कादायक असे की हा टूथब्रश साधा नव्हता तर चक्क अर्धा फूट लांब (6 इंच) होता.
या आधीही अशाच काही घटना घडल्या होत्या. मात्र, या घटना लहान मुलांसोबत घडल्या होत्या. मुंबई शहरातील परेल परेल परिसरातील एका लहान मुलाने चलनी नाणे गिळले होते. त्याही वेळी त्या मुलावर शस्त्रक्रिया करुन ते नाणे डॉक्टरांनी बाहेर काढले आणि चिमुकल्यास जीवदान दिले.या घटनेत आणखी एक धक्कादायक असे की, हे नाणे मुलाच्या घशात अडकले होते. पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतू नियानूसार त्याची कोरोना चाचणी करावी लागली. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत साधारण 8 ते 10 तास वाट पाहावी लागली. तोपर्यंत हा मुलगा घुसमटल्या अवस्थेत अन्न-पाण्यावाचून तसाच होता.