Aurangabad Crime: औरंगाबाद सहायक पोलीस आयुक्तावर गुन्हा दाखल, महिलेची छेड काढल्याचा आरोप

शहरातील सिटी चौक पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

औरंगाबाद शहर पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या आयुक्तांवरच (ACP - Assistant Commissioner of Police) चक्क विनयभंग आणि छेडछाडीचा आरोप झाला असून गुन्हाही दाखल झाला आहे. शहरातील सिटी चौक पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आरोपामध्ये म्हटले आहे की, विशाल ढुमे हे नाईट ड्युटीवर होते. यावेळी त्यांनी रात्री 2 वाजता एका महिलेच्या घरात घुसून तिची छेड काढली. या प्रकारामुळे औरंगाबाद शहरातच खळबळ उडाली आहे. कुंपणच जर शेत खात असेल तर सर्वसामान्यांनी दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल औरंगाबादकर आता विचारु लागले आहेत.

महिलेचा आरोप आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एसीपी विशाल ढुमे हे नाइट ड्युटीवर कार्यरत होते. या वेळी ते रात्रीच्या सुमारास एका हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. याच वेळी त्यांचा एक मित्र आपल्या पत्नीसह त्याच हॉटेलला आला. हॉटेलवर दोघांची भेट झाली. या वेळी ढुमे याने सांगितले की, माझ्याकडे गाडी नाही. त्यामुळे कृपया मला लिफ्ट मिळू शकेल का? यावर ढुमे यांच्या मित्राने त्याला होकार दिला. मात्र, गाडीत बसताच ढुमे याने मित्राच्या पत्नीसोबतच अश्लिल शब्दांत संवाद करण्यास आणि विनयभंग करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Mumbai Local Molestation Case: मुंबई लोकल विनयभंग प्रकरणी GRP कडून 43 वर्षीय आरोपीला महालक्ष्मी परिसरातून अटक)

ढुमे यांचा मित्र आणि त्यांची पत्नी गाडीत पुढच्या सीटवर बसले होते. ढुमे मागच्या सीटवर होते. तरीही ढुमे यांनी अश्लिल संवाद आणि विनयभंग सुरुच ठेवला. मित्राच्या पत्नीच्या पाठीवरुन हात फिरवणे असे प्रकार सुरु केले. नंतर ढुमे यांनी मला वॉशरुमला जायचे आहे. तुमच्या घरचे वॉशरुम वापरायला मिळेल काय? अशी विचारणा केली. मित्राने, त्यालाही परवानगी दिली. पण, नशेत तर्रर्र असलेले ढुमे सर्व मर्यादांच्या पलीकडे गेले होते. त्यांनी मित्राकडे आणि त्यांच्या पत्नीकडे 'मला तुमच्या बेडरुममधीलच' वॉशरुम वापरायचे आहे, असा आग्रह धरला. त्यानंतरही त्याने मित्राला मारहाण सुरु केली. त्याने तिथेही मित्राच्या पत्नीचा विनयभंग केला. सोबतच मित्रालाही मारहाण केली असा आरोप आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif