औरंगाबाद येथे आणखी 192 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 5 हजारांच्या पार

त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाच्या संक्रमितांच्या आकड्यात वेगाने भर पडत असून आणखी 192 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे औरंगाबाद मधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 5 हजारांच्या पार गेल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद येथे आढळून आलेल्या 192 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 115 पुरुष आणि 77 महिलांचा समावेश आहे. येथे एकूण 5757 कोरोनाबाधित रुग्ण संख्या असून 2741 जणांची प्रकृती सुधारली आहे. त्याचसोबत 263 जणांचा बळी गेला असून 2753 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स)

राज्यात काल (30 जून) दिवसभरात 4,878 कोविड रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,74,761 अशी झाली आहे. काल नवीन 1951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 90,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75,979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी राज्यात 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूदरापेक्षा रिकव्हरी रेट जास्त असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif