तिहेरी तलाकच्या नव्या कायद्यानुसार राज्यात पहिला गुन्हा दाखल

तिहेरी तलाक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, या नवीन कायद्यानुसार औरंगाबादमध्ये आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

तिहेरी तलाक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, या नवीन कायद्यानुसार औरंगाबादमध्ये आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. 20 वर्षीय तरुणीने हा गुन्हा आपला पती जावेद पठाण विरुद्ध दाखल केला आहे.

डिसेंबर 2016मध्ये जावेद आणि या तरुणीचे लग्न झाले. लग्नानंतर एक वर्षे सर्व ठीक ठक चालले होते मात्र, त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरु झाली. 9 सप्टेंबर 2018ला जावेदने आपल्या पत्नीला तिच्या नातेवाईकांकडे सोडले. त्यांनतर तप तिला न्यायला परत आलाच नाही. अचानक 23 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पती जावेदचा व्हॉट्‌सअॅपवर एक मेसेज आला. पतीने चक्क व्हॉट्‌सअॅपवरुन तिला तिहेरी तलाक दिला होता. “तुला पाच बहिणी आहेत आणि तुलाही पहिली मुलगीच झाली आहे, असे म्हणत या पतीने थेट व्हॉट्‌सअॅपवरुन तिहेरी तलाक दिला.

त्यानंतर औरंगाबादच्या वैजापूर पोलीस ठाण्यात या तरुणीने या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी नव्या कायद्यानुसार जावेद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जावेद हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 20 वर्षीय शबाना आज आपल्या एका वर्षाच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

India-Pakistan Tensions: मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके वाजवण्यास बंदी; पोलिसांनी जारी केले आदेश

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी

Advertisement

Sant Dnyaneshwar Maharaj Gyanpeeth: भागवत धर्मातील विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे उभे राहणार 'संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ'; सरकारकडून तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement