औरंगाबाद मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विकेंडलाही सुरू राहणार शाळा

शाळांमध्ये अनेक ठिकाणी शनिवारी हाफ डे असतो तर रविवारी शाळांना सुट्टी असते पण आता ऑफलाईन अभ्यास भरून काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार होत आहे.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना जागतिक महामारीमुळे (COVID 19 Pandemic) शिक्षणाचेही बारा वाजले आहेत. मागील दीड - दोन वर्ष शाळा-कॉलेज ऑनलाईन सुरू असल्याने अनेकांना अनेज अडथळे पार करत अभ्यास करावा लागला आहे. पण आता शाळा ऑफलाईन सुरू करण्याला सरकारने हिरवा कंदील दिला असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार -रविवार शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Mahanagar  Palika)  त्यांच्या शाळांसाठी घेतला आहे.

शाळांमध्ये अनेक ठिकाणी शनिवारी हाफ डे असतो तर रविवारी शाळांना सुट्टी असते पण आता ऑफलाईन अभ्यास भरून काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार होत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी या पर्यायाबाबत वक्तव्य केले होते. औरंगाबाद महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेच्या शाळा शनिवारी आणि रविवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

औरंगाबाद मध्ये पालिकेच्या 71 शाळा आहेत. त्यामध्ये 13500 विद्यार्थी शिक्षण घेतात. आता त्यांच्यासाठी विकेंडलाही शाळा सुरू ठेवल्या जाणार आहेत. नक्की वाचा: Schools Reopening in Maharashtra Update: 24 जानेवारी पासून राज्यात शाळा 'ऑफलाईन' सुरू करण्याला शासनाची परवानगी; पालकांची संमती आवश्यक .

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता पण कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर पालकांच्या संमतीने शिशू वर्गापासून पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.