Pune Crime: पुण्यात महिला ऑटो रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न, एकास अटक
आरोपीला अटक करण्यात आली आहे. निखिल अशोक मेमजादे असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. आत्तापर्यंतची संपूर्ण माहिती अशी की, तक्रारदार महिला या व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक आहेत.
पुण्यात (Pune) एका महिला ऑटो रिक्षा चालकावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आला आहे. महिलेच्या शौर्यामुळे आणि शहाणपणामुळे दुष्ट प्रवाशांची योजना फसली. ही घटना पुण्यातील कात्रज (Katraj) घाट परिसरातील आहे. येथे एक व्यक्ती प्रवासी म्हणून ऑटोरिक्षात बसली आणि थोडे अंतर चालल्यानंतर आपले खरे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने आपले सर्व कपडे काढले आणि नग्न होऊन अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. स्वत:ला अडचणीत सापडलेले पाहून ही 38 वर्षीय महिला ऑटोरिक्षाचालक पळून जाऊ लागली तेव्हा त्या व्यक्तीने तिचा नग्न अवस्थेत लांबपर्यंत पाठलाग केला.
याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. निखिल अशोक मेमजादे असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. आत्तापर्यंतची संपूर्ण माहिती अशी की, तक्रारदार महिला या व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक आहेत. 26 डिसेंबरच्या रात्री आरोपीने पीडितेकडे येऊन तिला कात्रज घाटावर जाण्यास सांगितले. यानंतर तो ऑटोरिक्षात बसला. हेही वाचा Madhya Pradesh Shocker: तरुणांकडून बहिणीचा व्हायचा लैंगिक छळ, मध्यस्थी करायला आलेल्या भावाची केली हत्या
यानंतर त्यांनी कात्रज घाटातील एका लॉजिंगजवळ ऑटोरिक्षा थांबवली आणि एकत्र जेवण करण्याचा आग्रह सुरू केला. संबंधित महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण आणि शिवीगाळ केली. यातून तो शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हट्ट करू लागला. यानंतर आरोपीने ऑटोरिक्षात सर्व कपडे काढले. तात्काळ सुटका करण्यासाठी पीडितेने कसा तरी तेथून बाहेर पडण्यात यश मिळविले.
मात्र मागून पळत असताना त्या व्यक्तीने महिलेचा विवस्त्र अवस्थेत पाठलाग केला. मात्र पीडितेने स्वत:ला वाचवण्यात यश मिळवले. ही घटना 26 डिसेंबरच्या रात्रीची आहे. या घटनेनंतर महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास व चौकशी सुरू आहे.