Sanjay Raut: 'हल्लेखोरांच्या घरातही आई-वडील, मुलं-बाळं असतील'; संजय राऊतांचा मनसैनिकांना इशारा (Watch Video)

तुमच्या घरातही आई-वडील, मुलं-बाळं आहेत. त्यामुळे तुम्ही या स्तरावर जर येत असाल तर काळजी घ्या. हे जे सर्व चालू आहे ते फक्त दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीच्या इशारावरून असे संजय राऊत म्हणाले.

Photo Credit- X

Sanjay Raut: ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर काल मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ताफ्यावर मनसैनिकांकडून नारळ, शेण, टोमॅटो फेकण्यात आले होते.यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीने काहींना सुपारी दिली आहे. त्यामुळे हा काळोखात हल्ला झाला मर्दाची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं, असं ते म्हणाले. (हेही वाचा: MNS Leader Avinash Jadhav: 'राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर घरात घुसून मारू', मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाकरे गटाला इशारा (Watch Video))

बीडमध्ये मनसे प्रमुखांसोबत जे झालं त्याचा शिवसेनेचा संबंध नाही, हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. पण,ॲक्शन रिएक्शन करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे, की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तुम्ही वाचला. मर्दाची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.(हेही वाचा:Attack on Uddhav Thackeray's convoys: मनसे कार्यकर्ते आक्रमक, उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यांवर नारळ आणि शेण फेक (Watch Video)

मला त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनीहे देवेंद्र फडणवीस मिंदे गट यांना माहिती आहे. समोर आले असते तर त्यांना सांगितलं असतं शिवसैनिक काय आहे, अशी टीका राऊतांनी केली.

संजय राऊत

काल ठाण्यामध्ये गडकरी रंगायटनमध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झाले . भरगच्च सभागृह होता. भगवा सप्ताह त्यानुसार ठाण्यात साजरा झाला. काल काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्धवजींना देखील माहीत नसावं. ते कार्यकर्ते अब्दुल शहा अब्दालीचे होते, असं संजय राऊत म्हणाले.