Ichalkaranji Dog Attack: भटक्या कुत्र्यांचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड (Watch Video)

त्यात कुत्र्यांचा हल्ला दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.

dog Attack PC INSTA

Ichalkaranji Dog Attack: रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला तर जीव कासावीस होऊन जातो. त्यात कुत्र्यांचा हल्ला दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. तरुण्याच्या मागे भटक्या कुत्र्यांचा झुंड लागला. पण पुढे जे झालं ते भयावह. कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी घाबरलेल्या तरुणाची इकडी आड तिकडे विहरी अशी गत झालेली व्हिडिओ पाहायला मिळत आहे. कुत्र्यांच्या चावडीतून वाचण्यासाठी त्याने थेट उडीच मारली. (हेही वाचा-जिवंत गाडलेल्या व्यक्तीला भटक्या कुत्र्यांनी वाचवले, चार जणांवर गुन्हा दाखल, आग्रा येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलेजच्या विद्यार्थ्यी रस्त्यावरून जात असताना. त्याचे मागे कुत्र्यांचा झुंड लागला. जीव वाचण्याच्या प्रयत्नात असताना मागचा पुढचा विचार न करता तरुणाने थेट जवळच असलेल्या बेसमेंटमध्ये उडी मारली. बेसमेंट जवळपास 10 फुट असावे. ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

ही घटना इचलकरंची येथील अग्रेसर भवन परिसरात घडली. रस्त्यावर जात असताना अचानक तरुण्याच्या मागे कुत्र्यांची टोळी मागे धावते. त्यानंतर तो जीव वाचण्यासाठी पळतो आणि थेट उडीच मारतो. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी देखील भटक्या कुत्र्यांच्या वावरण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. या आधी देखील कुत्र्यांनी हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif