मुंबई,पुणे, औरंगाबाद येथील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रसादामध्ये विष कालवून हत्याकांड घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन, IS च्या 9 संशयित दहशवाद्यांची ATS कडे कबुली

मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रसिद्ध मंदिरांमधील प्रसादात विष मिसळल्याचा IS च्या 9 संशयित दहशवाद्यांचा प्लॅन होता.

Poison Prasad Conspiracy Image used for representational purpose | (Archived, edited, representative images)

22 जानेवारी 2019 दिवशी मुंब्रा आणि औरंगाबाद येथून एटीएसकडून   (Anti-Terrorist Squad of Maharashtra) ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ संशयित दहशतवादींनी प्रसादामध्ये विष कालवून हत्याकांड घडवून आणण्याचा कट कबुल केला आहे. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबामध्ये दिलेल्या माहितीमध्ये मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रसिद्ध मंदिरांमधील प्रसादात विष मिसळल्याचा प्लॅन रचला होता अशी कबुली देण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, औरंगाबाद, मुंब्रा येथून नऊ जण ताब्यात; आयएसआयशी संबध असल्याचा संशय

अटकेनंतर आज औरंगाबाद येथील विशेष न्यायालयामध्ये आरोपींना सादर करण्यात आले होते. त्यावेळेस एटीएसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता या आरोपींना 14 फेब्रुवारी 2019 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

एटीएसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्‍यांच्या संपर्कामध्ये होते. यामध्ये काही फार्मासिस्ट आहेत. त्यांनी विषारी घटक बनवले असून ते प्रसादामध्ये मिसळण्याचा त्यांचा प्लॅन होता.

संशयित दहशतवादी इस्लामिक स्टेट म्हणजेच (IS)दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचा संशय आहे. प्रसादामध्ये विष कालवून हत्याकांड घडवून आणल्यानंतरत्यांचा सीरियाला पळून जाण्याचा प्लॅन होता.