Jaykumar Gore: आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, मयत व्यक्तीच्या नावे प्रतिज्ञापत्र बनविल्याचा आरोप
मयत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवत त्याच्याच नावे प्रतिज्ञापत्र तयार केले प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. महादेव पिराजी भिसे नामक व्यक्तीने सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.
भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा (Atrocities) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवत त्याच्याच नावे प्रतिज्ञापत्र तयार केले प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. महादेव पिराजी भिसे नामक व्यक्तीने सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलीस स्टेशनमध्ये (Dahiwadi Police Station) दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. मान-खाटाव विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे भाजप तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. गोरे यांच्यासोबतच त्यांच्या पाच सहकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. अनुसूचित जाती जमाकी कायद्यांतर्गत गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मायणी येथे छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन परिसरात प्रवेश करण्यासाठी गट क्रमांक 769 बद्ल एक दस्ताऐवज तयार करण्यात आला आहे. हा दस्त ऐवज ज्या व्यक्तीच्या नावे तयार करण्यात आला ती व्यक्ती हायात नाही. तरीही अल्पभूधारक राहिलेला हा व्यक्ती जिंवत असल्याचे दाखवत त्याच्या नावे दस्ताऐवज तयार करण्यात आला. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याची तक्रार महादेव भिसे यांनी दिली आहे. महादेव भिसे अल्पभूधारक हे अल्पभूधारक असून, गोरे यांनी ज्यांच्या नावे खोटा दस्त तयार केला त्यांचा मुलगाचे समजते. दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत पुष्टी केली आहे. (हेही वाचा, काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीमागील उद्देश वेगळाच, गोरे यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण)
जयकुमार गोरे हे सुरुवातीला काँग्रेस पक्षात होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी पाठिमागील निवडणुकीत त्यांचे सख्खे बंधु शेखर गोरे यांच्याविरोधात निवडणुक लढवली. भाजपने मान-खाटाव मतदारसंघ शिवसेनेला आपल्याला द्यावा अशी मागणी केली होती. मात्र, शिवसेनेने शेखर गोरे यांनाच तिकीट देऊन मैदानात उतरविण्याची मागणी केली होती. दरम्यान, भाजपने जयकुमार गोरे यांना तिकीट देत मैदानात उतरवले. जयकुमार हे या निवडणुकीत निवडूनही आले.