Atal Setu Toll: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी टोल आणखी एक वर्षासाठी 250 रुपये कायम; मंत्रिमंडळात निर्णय

अटल सेतूवर एका प्रवासासाठी 250 आणि जाऊन येऊन प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे.

Atal Setu Toll: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी टोल आणखी एक वर्षासाठी 250 रुपये कायम; मंत्रिमंडळात निर्णय
Atal Setu Mumbai | X

मुंबई मध्ये 5 एन्ट्री पॉईंट्स वर टोल माफी देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने मुंबईकरांना मुंबई ते नवी मुंबई अटल सेतूने (Atal Setu) प्रवास करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा पूलावर (Atal Bihari Vajpayee Sewri–Nhava Sheva Atal Setu) पुन्हा पुढील वर्षभरासाठी टोल 250 रूपये कायम ठेवला आहे. अटल सेतूवर एका दिशेच्या प्रवासासाठी 250 आणि जाऊन येऊन प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जातो. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर आता अटल सेतू वर टोल वाढणार नाही.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटलसेतूचं उद्घाटन झालं आहे. या पूलाला 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू' असं नाव देण्यात आलं आहे. 17,840 कोटी रूपये खर्च करून हा पूल निर्माण करण्यात आला आहे. हा 22 किमी चा पूल आहे. यामुळे मुंबई-नवी मुंबई प्रवास वेगवान झाला आहे. Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu: आता अटल सेतूमार्गे मुंबई ते नवी मुंबई प्रवास झाला स्वस्त; NMMT ने भाड्यात केली 50 टक्के कपात, जाणून घ्या नवे दर .

मंत्रिमंडळामध्ये निर्णय

सध्या अटलसेतू वर कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक या वाहनांना प्रवासाची परवानगी आहे. दरम्यान अटलसेतू वर वर्दळ कमी असल्याने पुढील वर्षभरासाठी टोल न वाढवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).