Assembly Elections 2024: बंडखोर पक्षादेश पाळणार? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस

त्यामुळे शिवसेना (UBT), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती आणि महाविकास आघाडी घटक पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत.

Elections | (File Image)

विधनसभा निवडणूनक 2024 (Maharashtra Assembly Elections) प्रक्रिया वेग घेत आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत केव्हाच संपली असून ती मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. छाननीमध्ये वैध ठरले असले तरी, आपले उमेवादी अर्ज आज दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता (Withdrawal of Nominations) येणार आहेत. त्यानंतर जे अर्ज उरतील ते सर्व उमेदवार म्हणून घोषीत होतील. तसेच, त्यांच्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. परिणामी आपापल्या पक्षाचे उमेदवार सुरक्षित किंवा लढत सोपी करण्यासाठी नाराजांना आणि बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी महायुती आणि महाविकासाघाडी घटक पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यातच काही बंडखोर उमेदवार आपले फोन बंद करुन बसल आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधायचा तरी कसा? हा प्रश्न नेतृत्वासमोर आहे.

बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सत्ताधारी महायुतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाविकासाआघाडीमधून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला सक्रीय आहेत. (हेही वाचा, Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान)

लक्ष्यवेधी बंडखोर

बोरिवली: गोपाळ शेट्टी- भाजप

नांदगाव: समीर भुजबळ- राष्ट्रवादी (अजित पवार)

बेलापूर: विजय नहाटा- शिवसेना (एकनाथ शिंदे)

विजय चौगुले- शिवसेना (एकनाथ शिंदे)

महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये जवळपास 10 ते 15 जागांवर बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी पक्षांर्गत आहे तशीच ती मित्रपक्षांकडूनही झाली आहे. काही मतदारसंघात तर युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये अद्यापही वाटाघाटी सुरुच आहेत. पर्यायाने पक्षनेतृत्वांची साद ऐकत बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेण्या साजी होणार का? की, आज दुपारी तीन वाजेपर्यंत संपर्क कक्षेच्या बाहेर राहात उमेदवारी कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही)

'राज'पूत्रासाठी कार्यकर्त्यावर दबाव

माहीम विधानसभा मतदारसंघात एक विचित्रच तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाने मंगेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना महायुतीने पाठिंबा द्यायला हवा, असे भाजपने म्हटले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आणि पर्यायाने उमेदवार सदा सरवणकर यांच्यावरील उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. शिवाय ते या आधीही अनेक वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर 'राज'पूत्रासाठी स्थानिक कार्यकर्त्यावर दबाव आल्याचे बोलले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif