विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) दुसरी , राष्ट्रवादी काँग्रेस (SS) आणि काँग्रेस पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर
सेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत अनुक्रमे 15 आणि 3 उमेदवारांची नावे आहेत. काग्रेसच्या 23 तर शरद पवार यांच्या पक्षाच्या 22 जागांचा समावेश आहे. तिन्ही पक्षांची यादी खालील प्रमाणे:
महाविकासआघाडीमधील उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena (UBT)), काँग्रेस (Congress) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. आज दिवसभरात या ठाकरे यांच्या पक्षाने दोन आणि NCP (SS), काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी
- वर्सोवा: हरुन खान
- घाटकोपर पश्चिम: संजय भालेराव
- विलेपार्ले: संदिप नाईक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची दुसरी यादी
एनसीपी (SP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. ती खालील प्रमाणे:
- एरंडोल: सतीश अण्णा पाटील
- गंगापूर: सतीश चव्हाण
- शहापूर: पांडुरंग बरोरा
- परांडा: राहुल मोटे
- बीड: संदीप क्षीरसागर
- आर्वी: मयुरा काळे
- बागलान: दीपिका चव्हाण
- येवला: माणिकराव शिंदे
- सिन्नर: उदय सांगळे
- दिंडोरी: सुनीताताई चारोसकर
- नाशिक पूर्व: गणेश गिते
- उल्हासनगर: ओमी कलानी
- जुन्नर: सत्यशील शेरकर
- पिंपरी: सुलक्षणा शिलवंत
- खडकवासला: सचिन दोडके
- पर्वती: अश्विनीताई कदम
- अकोले: अमित भांगरे
- अहिल्यानगर शहर: अभिषेक कळमकर
- माळशिरस: उत्तम जानकर
- फलटण: दीपक चव्हाण
- चंदगड: नंदिनीताई कुपेकर
- इचलकरंजी: मदन कारंडे (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2024: शिवसेना (UBT) 15 आणि काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा यादी)
काँग्रेस पक्षाची दुसरी उमेदवार यादी
- भुसावळ: राजेश मानवतकर
- जळगाव (जामोद): स्वाती वाकेकर
- अकोट: महेश गांगणे
- वर्धा: शेखर शेंडे
- सावनेर: अनुजा सुनील केदार
- नागपूर दक्षिण: गिरीश पांडव
- कामठी: सुरेश भोयर
- भंडारा: पूजा ठावकर
- अर्जुनी-मोरगाव: दलिप बनसोड
- आमगाव: राजकुमार पुरम
- राळेगाव: वसंत पुरके
- यवतमाळ: अनिल (बाळासाहेब) मंगुळकर
- अर्णी: जितेंद्र मोघे
- उमरखेड: साहेबराव कांबळे
- जालना: कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्व: मधुकर देशमुख
- वसई: विजय पाटील
- कांदिवली पूर्व: काळू बढेलिया
- चारकोप: यशवंत सिंग
- सायन कोळीवाडा: गणेश कुमार यादव
- श्रीरामपूर: हेमंत ओगळे
- निलंगा: अभयकुमार साळुंखे
- शिरोळ: गणपतराव पाटील
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबरसाठी मतदान पार पडत आहे. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये म्हणजे 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने आगोदरच जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 नोव्हेंबरपर्यत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण केला जाणार आहे.