मुंबई: कोरोना विषाणूमुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा मृत्यू
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झापाट्याने होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातारण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना संकटात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांनाही विषाणूने घेरले आहेत.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झापाट्याने होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना संकटात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांनाही विषाणूने घेरले आहेत. यातच वाहतूक विभागात कार्यरत असलेले आणि सध्या सहार येथे नेमणुकीला असलेले सहायक उपनिरीक्षक भिवसेन पिंगळे (ASI Bhivsen Haribhau Pingle) यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सर्दी, ताप तसेच इतर लक्षणे असल्याने पिंगळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) हळहळले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात झुंज देत आहेत. मात्र, या कठीण काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरही कोरोनाचे संकट ओढवत चालले आहे. धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भिवसेन पिंगळे यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला आहे. हे देखील वाचा- मुंबईतील पार्कसाईट पोलीस स्थानकात कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल यांचे COVID19 मुळे निधन
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 15 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 11 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. पुण्यात दोन तर नाशिक आणि सोलापूरमध्ये प्रत्येक एक पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.