माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस नेते Ashok Chavan यांच्या घातपाताचा कट? CM Eknath Shinde यांनी दिले चौकशीचे आदेश

बोगस लेटरपॅडच्या आधारे अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहे अशा प्रकारचा खोटा संभ्रम लोकांमध्ये निर्माण केला जात असल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केला आहे.

Ashok Chavan| Twitter

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नावे खोटं लेटरपॅड (Document Forgery) तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोबतच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या खळबळजनक दावा अशोक चव्हाणांनी केला आहे. याप्रकरणी नांदेड जिल्हा अध्यक्षांना भेटून त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

बोगस लेटरपॅडच्या आधारे अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहे अशा प्रकारचा खोटा संभ्रम लोकांमध्ये निर्माण केला जात असल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केला आहे. या बोगस पत्रामागील सूत्रधार कोण आहे? याचा तपास व्हावा याची मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. सोबतच आपल्यावर पाळत ठेवली जात असून 'याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे' असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान आपण कुठे जातो, कुणाला भेटतो यावर पाळत ठेवली जात असल्याचं ते म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

'अशोक चव्हाण जीव गेला तरी ड्युप्लिकेट अशोक चव्हाण करता येणार नाही. हा प्रकार केविलवाणा आणि दुर्दैवी आहे. खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता होता येत नाही' असं ते म्हणाले आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांनी याप्रकरणी कोणतेही नाव घेणं टाळलं आहे.

काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी काम करणार्‍या विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झाला. त्यामध्ये त्याचे निधन झाले. मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला येतानाच हा प्रकार घडला आहे.