Ashish Deshmukh Join BJP: काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांचा 'भाजप'मध्ये प्रवेश
असा इशारा दिला आहे.
काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी अखेर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत नागपुरात हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी त्यांच्या आगामी वाटचालीबद्दल बोलताना विरोधकांना सुचक इशारा दिला आहे. (हेही वाचा - Sanjay Raut Allegation On Abdul Sattar: मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरीने सैनिकांची जमीन बळकावली; संजय राऊत यांचा आरोप)
काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांच्यावर पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांनी अनेक भाजप नेत्यांची भेट घेतल्यानेही त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता. काही दिवसापुर्वीच देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या प्रवेशापुर्वी दोन दिवसांपूर्वी त्यांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती.
पक्षप्रवेशानंतर बोलताना आशिष देशमुख यांनी काकागिरी, दादागिरी आणि नानागिरी संपविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा दिला आहे. तसेच मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.