Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे 11 जूनला होणार प्रस्थान

Pandharpur Wari | (File Image)

वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने देखील आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करून 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट विठुरायांशी होईल. 18 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतील.

11 जूनला पालखीचे आंळदीमधून प्रस्थान झाल्यानंतर पुणे शहरात दोन दिवस ही पाळखी असेल त्यानंतर 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे.21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. दिनांक 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलैला परतीच्या प्रवासासाठी निघेल.

यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif