Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर
तर 12 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सण साजरा केला जाणार आहे.
Sant Tukaram and Sant Dnyaneshwar Ashadhi wari Time Table: महाराष्ट्रातील लाखो वारकर्यांसाठी महत्त्वाची असणारी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) यंदा 12 जुलैला आहे.या आषाढी एकादशीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. आषाढीची वारीचं आकर्षण असणार्या संत ज्ञानेश्वर (Sant Dyaneshwar) आणि तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram) पालखीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 24 जून तर 25 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सविस्तर वेळापत्रक; गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?
250 किमी चा रस्ता, 21 दिवसांचा पायी प्रवास करून टाळ-मृदृंगाच्या तालवर नाचत गात वारकरी मंडळी विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला येतात. महाराष्ट्राला 700 वर्षांची वारकरी संप्रदयाची परंपरा आहे. आजही महाराष्ट्रात ही परंपरा कायम आहे. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर / संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक
आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यादिवशी वारकरी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. 17 दिवसांची पायी वारी करून तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 11 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. तर 12 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सण साजरा केला जाणार आहे.