Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उघडताच दोन हजारांहून अधिक भाविकांनी घेतले श्रीगणेशाचे दर्शन

परिणामी, राज्यातील सर्व मंदिरासह धार्मिक स्थळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती.

Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, राज्यातील सर्व मंदिरासह धार्मिक स्थळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती. मात्र, आता दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर ही धार्मिक स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. यामुळे भाविकांमध्ये आनंद पसरला असून दर्शनासाठी त्यांनी मंदिरात धाव घेतली आहे. यातच पुण्यातील श्रीमंत दगडू हलवाई गणपती मंदिर (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) उघडताच 2 हजारांहून अधिक भाविकांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतले आहे. दरम्यान, प्रत्येक भाविक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना दिसले आहेत.

राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे आज उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळे उघडण्यानंतर भाविकांनी जवळच्या मंदिराकडे धाव घेतली आहे. दरम्यान, काही मंदिरात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गर्दीला राज्य सरकारचे जबाबदार आहे, असा अजब दावा विरोधकांनी केला आहे. हे देखील वाचा- Diwali 2020: दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट (Watch Video)

मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.