मुंबई मध्ये घरांच्या किंमती 6 लाखांनी कमी होण्याची शक्यता; प्रिमियम मध्ये 50% सवलतीमुळे फायदा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न आवाक्यात येण्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न आवाक्यात येण्याची चिन्हं आहेत. मुंबईत घरं या नव्या निर्णयामुळे 6 लाखांनी कमी होऊ शकतात. जे गृहनिर्माण प्रकल्प राज्य सरकारच्या या सवलतीचा लाभ घेणार आहेत ते आपल्या ग्राहकांच्या वतीने पूर्ण मुद्रांक शुल्क भरणार आहेत. त्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक भार थोडा कमी होणार असून घर खरेदी वाढेल अशी शक्यता आहे. Maharashtra Cabinet Meeting Decision: बांधकाम विकासकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत; पाहा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक निर्णय.
सुरूवातीला नोटबंदी आणि नंतर कोरोनाचं संकट यामुळे घर खरेदी-विक्रीचे व्यवहार कोलमडले होते. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असताना राज्याची आर्थिक घडी बसवण्याचं काम करताना मंत्रिमंडळाकडून एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
बीएमसीच्या हद्दीमध्ये 3500 ते 5000 फ्लॅट्सच्या सोसायटीमध्ये प्रिमियम शुल्क 500 कोटी पर्यंत असतं. प्रत्येक फ्लॅटमागे हा खर्च अंदाजे 12.50 लाख असतो. जर त्यामध्ये 50 % सूट मिळाली तर तो 6.25 लाखांपर्यंत असेल. परिणामी घराच्या किंमती 6 लाखांनी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे.
गेल्या तीन महिन्यात एकूण 6439 घरांची खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे. सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वाधिक झाली आहे. आता बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2021 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

