गँगस्टर अरुण गवळी याला हायकोर्टाचा दणका, पॅरोल वाढवून मिळणार नसल्याने तळोजा जेलला सरेंडर होण्याचे निर्देशन

तसेच अरुण गवळी यांना तळोजा जेलला तातडीने सरेंडर होण्याचे निर्देशन दिले आहेत.

अरुण गवळी (Photo Credits-Facebook)

गँगस्टर अरुण गवळी (Arun Gawli)  यांना हायकोर्टाने (High Court) दणका देत पॅरोल (Parole)  वाढवून मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच अरुण गवळी यांना तळोजा जेलला तातडीने सरेंडर होण्याचे निर्देशन दिले आहेत. सध्या अरुग गवळी पॅरोलमुळे घरी आले आहेत. त्यांची पॅरोलची मुदतवाढ 24 मे पर्यंत वाढवून देण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र डॅडी यांना आता तुरुंगात सरेंडर होण्यासाठी सांगण्यात आले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निर्देशन दिल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अरुण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाह सोहळा दगडी चाळीत पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी अरुण गवळी यांना पॅरोल देण्यात आला होता. त्यानंतर गवळी यांनी पॅरोल वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. तसेच गेल्या काही दिवसातील वागणू पाहता ती चांगली असल्याचे सांगत त्यांनी पॅरोल वाढवण्याबाबत म्हटले होते. परंतु हायकोर्टाने त्यांच्या या मागणीला नकार दिला आहे. नागपूर मधील सेंट्रल तुरुंगात असणाऱ्या गवळी यांना तळोजा मधील जेलला सेंडर होण्यासाठी सांगण्यात आले आहे.(अरुण गवळी यांना लॉकडाउनचा फायदा)

Pune Fire: पुणे येथील कुरकुंभ MIDC भागातील केमिकल फॅक्टरीला आग - Watch Video

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पत्नीच्या आजारपणाच्या कारणाने अरुण गवळी यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27एप्रिलला त्याने कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. मात्र यावेळी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने त्यांच्या पॅरोल मध्ये 10 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.