अरुण गवळी यांना लॉकडाउनचा फायदा; 24 मे पर्यंत मिळाली पॅरोल वाढ
लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अरुण गवळी यांना पॅरोलवर बाहेर राहण्यासाठी 24 मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं खबरदारीचा पर्याय म्हणुन देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या वाढलेल्या लॉकडाउनचा फायदा आता कुख्यात गुंड डॅडी म्हणजेच अरुण गवळी (Arun Gawali) यांना झाला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अरुण गवळी यांना पॅरोलवर बाहेर राहण्यासाठी 24 मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अरुण यांच्या पॅरोल मुदवाढ संदर्भातील याचिका स्वीकारुन न्या. स्वप्ना जोशी यांनी निर्णय दिला.अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी आणी अभिनेता अक्षय वाघमारे यांचा विवाह सुद्धा पार पडला, पहा या लग्नसोहळ्याचे फोटो
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पत्नीच्या आजारपणाच्या कारणाने अरुण गवळी यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27एप्रिलला त्याने कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. मात्र यावेळी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने त्यांच्या पॅरोल मध्ये 10 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.
दरम्यान 10 मे ला कारागुहात परतायचे असताना लॉकडाउन वाढल्याने मुदतवाढीची याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेनुसार आता ही मुदतवाढ 24 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.