Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अहमदनगर आणि सोलापूर येथून लाखो रुपयांची रोकड जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर आणि सोलापूर येथून पोलिसांनी 1 करोड रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त केली आहे.
Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर (Ahmadnagar) आणि सोलापूर (Solapur) येथून पोलिसांनी 1 करोड रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त केली आहे.
अहमदगर येथील वैदूवाडी परिसरात एका रिक्षामधून 84 लाख रुपये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेरांकडून देण्यात आली. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून या रिक्षामधील मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु ही रक्कम नेमक्या कोणत्या कारणासाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झालेले नाही. आयकर विभागाकडे या प्रकरणाचा तपास करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे.(हेही वाचा-यवतमाळ येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या, चिठ्ठीत भाजप-शिवसेना जबाबदार असल्याचा खुलासा)
तर सोलापूर येथे 23.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केली आहे. नाकाबंदी असताना पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2019 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

