Nitesh Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे, संजय राऊत पाकिस्तानी एजंट आहेत का? नितेश राणेंचा UBT शिवसेना गटाला सवाल

हजारो रामभक्त सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दंगल घडवण्याबाबत बोलत आहेत.

Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

Nitesh Rane On Uddhav Thackeray: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बुधवारी यूबीटी सेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या यूबीटी (UBT) नेत्यांवर घणाघाती हल्ला चढवत राणे म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लवकरच देशाच्या विविध भागातून अनेक भाविक मंदिराच्या भव्य उद्घाटनासाठी हजेरी लावणार असल्याचे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणेंची ही प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी भाविकांच्या गाडीवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली होती.

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक भारतीय अयोध्येतील राममंदिराच्या भव्य उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहे. हजारो रामभक्त सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दंगल घडवण्याबाबत बोलत आहेत. (हेही वाचा -Upendra Sawant Joined Shiv Sena: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! शिवसेनेचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश)

जेव्हा-जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वादग्रस्त भाषा बोलतात. मात्र, मुस्लिमांचे सण आले की हे दोन्ही नेते एक शब्दही उच्चारत नाहीत. उद्धव आणि राऊत पाकिस्तानचे एजंट आहेत का? मला याबद्दल शंका आहे. याची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून पुरेशी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र एटीएसला पत्र लिहिणार असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.