Pankaja Munde And Vinod Tawde: पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती
त्यानंतर या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, अखेर आता पक्षाने विनोद तावडे (Vinod Tawde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव (National Secretary) म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय विजया रहाटकर, (Vijaya Rahatkar) सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनादेखील राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या यादीत सर्वांचे लक्ष ज्या नावाकडे लागले होते, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मात्र, यात कोणतही स्थान मिळालेलं नाही. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
Pankaja Munde And Vinod Tawde: भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणूकीत डावलण्यात आलं होतं. त्यानंतर या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, अखेर आता पक्षाने विनोद तावडे (Vinod Tawde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव (National Secretary) म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय विजया रहाटकर, (Vijaya Rahatkar) सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनादेखील राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या यादीत सर्वांचे लक्ष ज्या नावाकडे लागले होते, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मात्र, यात कोणतही स्थान मिळालेलं नाही. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
जे. पी. नड्डा यांनी घोषणा केलेल्या यादीनुसार, महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर. तसेच राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे. (हेही वाचा - Atul Bhatkhalkar Criticizes Sanjay Raut: सतत शरद पवार यांच्यासोबत राहून संजय राऊत यांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली- अतुल भातखळकर)
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपने विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु, या दोन्ही नेत्यांनी नंतरच्या काळात संयम बाळगत भाजप निष्ठा चालू ठेवली. अखेर आज पक्षाने पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली.
विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी भाजपला अनेकदा घरचा आहेर धाडला होता. मागील आठवड्यात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं पाहायला मिळालं होतं. आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये खडसे यांचे नाव नसल्याने ते पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र डागवू शकतात.