अनिल परब दाखल करणार किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार आणि याचिका; प्रतिमा बदनाम केल्याचा आरोप

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे.

अनिल परब | (File Photo)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मंगळवारी सांगितले की, ते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करणार आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, साई रिसॉर्ट्स प्रकरणात भाजप नेत्याने त्यांची प्रतिमा बदनाम केल्याबद्दल ही तक्रार दाखल केली जाणार आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे.

साई रिसॉर्ट्सच्या विध्वंसाला सुरुवात होणार असल्याची घोषणा करत, प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीला पोहोचण्याच्या सोमय्या यांच्या हालचालीला परब उत्तर देत होते. ते म्हणाले की, ‘मी सरकारी तपास यंत्रणांच्या विरोधात नाही. ज्या एजन्सींनी मला अनेकदा फोन केला त्यांना मी सर्व माहिती सादर केली आहे. प्रत्येक वेळी मी चौकशीसाठी हजर झालो आहे. साई रिसॉर्ट्सशी माझा काहीही संबंध नसल्यामुळे मी यापुढेही तपास यंत्रणांना सहकार्य करेन.’

ते पुढे म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी माझ्यावर कलम 420 चा समावेश करून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या जात आहेत आणि त्यानंतर पोलीस आणि सरकारवर दबाव आणला जात आहे. हे सर्व एक नाटक आहे. सोमय्या आणि त्यांच्या पक्षाला कोणी विचारत नाही. मी यापूर्वीच सोमय्या यांच्याविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. पण सोमय्या माझ्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य करत असल्याने आता मी त्यांच्या विरोधात फौजदारी रिट याचिकाही दाखल करणार आहे.’ (हेही वाचा: Ashok Chavan On Governor: कोश्यारींना हटवून महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट्स अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif