महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून 'नाथाभाऊ समर्थक जोडो अभियान' लवकरच जळगावात होणार सुरु
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून नाथाभाऊ समर्थक जोडो अभियान जळगाव जिल्ह्यात लवकरच सुरुवात होत आहे.
पुरोगामी विचारसरणीचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे व यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून नाथाभाऊ समर्थक जोडो अभियान जळगाव जिल्ह्यात लवकरच सुरुवात होत आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता जोडो अभियनाची ही सुरवात केली जात आहे. एकनाथराव खडसे यांना मानणाऱ्या सर्व नवीन फळीच्या कार्यकर्त्यांना व जुन्या जाणकार राजकीय लोकांना पुन्हा संघटित सक्रिय करून एकत्र करण्यासाठी नाथाभाऊ समर्थक जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे.
ओबीसीचे आगामी बहुजन नेतृत्व एकनाथराव खडसे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने कसा अन्याय केला यांना कसा त्रास दिला यांनी दगड धोंडे खाऊन भाजपा पक्ष राज्यात वाढवला ज्यांनी भाजपाचे पायामुळे महाराष्ट्रात रुजवली त्यांना भारतीय जनता पार्टी झाली नाही. त्यांच्यासोबत जाती-पातीचे राजकारण केलं मुख्यमंत्री पदाचे दावेदार असून सुद्धा केवळ ओबीसी आणि बहुजन नेतृत्व आहे. म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदासाठी डावलले गेले . ज्यांच्या जीवावर एकतर्फी सत्ता भाजपने राज्यात मिळवली अशा व्यक्तीला भाजप व भाजपाचे नेते झाले नाहीत. तर तुमच्या-आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय होणार. चाळीस वर्ष भाजप पक्षाची सेवा करणाऱ्याला भाजप पक्षातुन ढकलून देतो तर तुम्हाला आम्हाला काय नाय देणार. त्यामुळे आजच्या युवापिढी तरुणांनो जागे व्हा. पुरोगामी विचारसरणीच्या पक्षात काम करा जिथे तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल तुम्हाला मान सन्मान या मिळेल तुमचा आणि तुमच्या समाजाचा विकास होईल अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत नाथाभाऊ खडसे यांच्या खांद्याला खांदा लावून या पक्षात काम करा नक्की आपल्याला व आपल्या समाजाला न्याय मिळेल.
मागील काळात ज्या व्यक्तीच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्रात पाच वर्षे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्यात सत्ता भोगली भाजपाचा मुख्यमंत्री झाला आशी व्यक्ती नाथाभाऊ खडसे यांच्या सोबत भाजपाने काय केले त्यांना कसे पक्षाच्या बाहेर ढकलून दिले हे सांगण्यासाठी शेकडो, कार्यकर्ते रोडावर निघणार आहेत गावो गावी. जाणार आहेत
केवळ फक्त एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांच्या अपारकष्ट व मेहनतीमुळे भाजपाची मागील काळात राज्यात सत्ता आली होती. हे स्पष्ट आहे याबाबत राज्याच्या जनतेलाही माहीत आहे. जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहे. म्हणजे २ खासदार आणि ११ विधानसभा मतदारसंघ क्षेत्र आहे म्हणजे एकूण ११ आमदार आहेत .जळगाव जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. या सर्व तालुक्यामध्ये नाथाभाऊ खडसे यांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे. नवीन फळीच्या सर्व कार्यकर्त्यांना तरुणांना नाथाभाऊ खडसे यांचे कार्य व बहुजन समाजा बद्दलची एकनाथ खडसे यांची तळमळ सांगण्यासाठी खडसे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियान हे सुरू करण्यात येत आहे.
पुरोगामी विचारसरणीचे एखाद्या राजकीय नेतृत्वाला कसे संपवले जाते व यांच्यावर कसा अन्याय केला जातो हे सांगण्यासाठी अनिलभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे समर्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियाना मध्ये एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांनी चाळीस वर्षात केलेले कार्य व भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत भाजपा पक्ष कुठे होतो व कुठे आणला आणि पक्ष वाढल्यानंतर यांच्यावर भाजापा ने कसा अन्याय केला हे सर्व आम्ही या अभियनाच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाडी फिरून नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहोत असे महाजन यांनी सांगितले.
देशात दोन खासदारांची पार्टी असलेली भारतीय जनता पार्टी आज केंद्रात बहुमता पर्यंत कशी पोहोचली यासाठी महाराष्ट्रातून सिंहाचा वाटा कोणाचा हे सांगण्यासाठी आम्ही या अभियानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. एक कार्यकर्ता घडवणारा व्यक्ती जनसामान्य लोकांसाठी लढणारा नेता म्हणजे नाथाभाऊ खडसे त्यांच्यावर मागील काळात कसे खोटे नाटे आरोप केले गेले काही लोकांना यांच्या पाठिमागे कसे लावले गेले हे गावोगावी गल्लोगल्ली जाऊन जनते मध्ये या अभियानाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या राजकीय करियर कसं संपवायचं आणि बहुजन समाजाला विकासापासून कसं वंचीत ठेवायचं हे भाजपा कडून शिकले पाहिजे. पुढच्या महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे व याचा वनवा हळूहळू महाराष्ट्रभर सर्व नाथाभाऊ समर्थक पेटवणार आहेत.