Anil Deshmukh Autobiography: अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र 'Diary of a Home Minister' होणार निवडणुकीपूर्वी प्रकाशित; भाजपकडून टीका

भाजपाचे राम कदम याला आपली कलंकित प्रतिमा नष्ट करण्याचा प्रयत्न म्हटले आहे.

Anil Deshmukh Autobiography | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे आत्मचरित्र 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर ' (Diary of a Home Minister) लवकरच प्रकशित होणार आहे. येत्या विधानसभा निवडणूक 2024 पूर्वीच ते प्रकाशित होईल, अशी माहितीही देशमुख यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. ज्यात त्यांचा तुरुंगातील काळ आणि राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या कथित अत्याचारांचे वर्णन आहे. या पुस्तकात त्याच्या 14 महिन्यांच्या तुरुंगवासावर आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कटावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) केलेल्या तपासानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांना 2021 मध्ये मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) आणि भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 13 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये आर्थर रोड कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली. आता, निवडणुका जवळ येत असताना, देशमुख (Anil Deshmukh Autobiography) यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे आधीच राजकीय वाद निर्माण झाला आहे.

देशमुखांच्या पूस्तकावर राम कदम यांची टीका

अनिल देशमुख यांनी पुस्तक प्रकाशनाची घोषणा करताचवभाजपाचे आमदार राम कदम यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी देशमुख यांच्यावर 'हे पुस्तक म्हणजे निवडणुकीपूर्वी आपला कलंकित चेहरा साफ करण्याचा प्रयत्न' असल्याचा आरोप केला. एका व्हिडिओ निवेदनात, कदम यांनी देशमुख यांच्या पुस्तक प्रकाशित करण्याच्या निर्णयावर टीका केली आणि त्याला त्यांची प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याची राजकीय रणनीती म्हटले.

अनिल देशमुख यांचे संकेत

'धक्कादायक सत्ये' उघड करणार देशमुख यांचे पुस्तक?

देशमुख यांनी त्यांच्या आगामी आत्मचरित्राचे मुखपृष्ठ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (formerly Twitter) गुरुवारी शेअर केले. सोबतच एक पोस्टही लिहीली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, "प्रत्येक हेडलाईनच्या मागे एक कथा दडलेली असते – माझ्या राजकीय आत्मकथेत लपलेले धक्कादायक सत्य आणि खुलासे नक्की जाणून घ्या. देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देईल अशा माझ्या पुस्तकाचं कव्हर पेज शेअर करत आहे!".

भाजप नेते राम कदम यांची टीका

अनिल देशमुख हे पुस्तक निवडणुकीपूर्वी प्रकाशित करून महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांना निवडणूक लढवायची आहे, पण ते जनतेला सामोरे जाऊ शकत नाहीत. देशमुख यांनी बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून 100 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. या आरोपांचा संदर्भ देत कदम म्हणाले की, ते मनी लाँड्रिंगच्या आरोपात सामील होते हे महाराष्ट्रातील नागरिक विसरलेले नाहीत. एमव्हीएला 'महा विकास आघाडी' ऐवजी 'महासूली आघाडी' म्हणून संबोधत कदम यांनी त्यावरही टीका केली.