Andheri Bypoll Result 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल आज जाहीर होणार, मतमोजणीस सुरुवात

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (6 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. त्यामुळे या निवडणुकीची राज्यभर आणखीच चर्चा सुरु झाली.

Andheri East Bypoll | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Andheri Bypoll Result 2022) आज (6 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. त्यातच शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरुद्ध उतरवलेला उमेदवार भाजपने ऐनवेळी मागे घेतला. त्यामुळे या निवडणुकीची राज्यभर आणखीच चर्चा सुरु झाली. त्यामुळे आज मतमोजणीत काय निकाल लागतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. . सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी म्हणावा तसा उत्साह दाखवला नव्हता. त्यामुळे मतदानाचा टक्काही विशेष समाधानकारक पाहायला मिळाला नाही. या निवडणुकीसाठी एकूण 31.74 टक्के इतकेच नगण्य मतदान झाले. या निवडणुकीत मुख्य प्रवाहातील कोणत्याच राजकीय पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानले जात आहे. तरीही निवडणुकीच्या रिंगणात काहीही घडू शकते. त्यामुळे मतमोजणी पूर्ण झाल्यावर येणाऱ्या निकालाबाबत उत्सुकता कायम आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती.

दरम्यान, अर्ज दाखल केल्यावर असलेली उमेदवारांची बहुगर्दी छाननीत कमी झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत अनेकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात सातच उमेदवार राहिले. त्यांची यादी खालील प्रमाणे-

  • पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात
  • ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
  • मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
  • नीना खेडेकर (अपक्ष)
  • फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
  • मिलिंद कांबळे (अपक्ष)
  • राजेश त्रिपाठी (अपक्ष)

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसोबतच देशभरात सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठी (Bye Election 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणीही आजच पार पडत आहे. यापैकी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि प्रादेशिक पक्षांमध्ये थेट लढत आहे. ही निवडणूक महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East seat in Maharashtra), तेलंगणातील मुनुगोडे (Munugode in Telangana), बिहारमधील गोपालगंज आणि मोकामा (Gopalganj and Mokama in Bihar), हरियाणातील आदमपूर ( Adampur in Haryana), उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ (Gola Gokarannath in Uttar Pradesh) आणि ओडिशातील धामनगर (Dhamnagar in Odisha) या जागांसाठी पार पडली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now