Andheri Bypoll Result 2022: उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष, ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय
त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) जल्लोष केला जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडणार आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) जल्लोष केला जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या पार पडल्या. 15 व्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांनी निर्णायक मते मिळवली आणि विजयाकडे कूच केली. दुसऱ्या बाजूला ऋतुजा लटके यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना किमान मतेही मिळवता आली नाहीत. त्याउलट मतदारांनी 'नोटा'ला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. जाणून घ्या ऋतुजा लटके यांना कोणत्या फेरीत किती मते.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चारही फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. फेरीनिहाय निकाल खालील प्रमाणे. (हेही वाचा, Andheri Bypoll Result 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल आज जाहीर होणार, मतमोजणीस सुरुवात)
मतमोजणीची पंदरावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -55946, बाळा नाडार -1286, मनोज नाईक - 785, मीना खेडेकर - 1276, फरहान सय्यद - 932, मिलिंद कांबळे - 546, राजेश त्रिपाठी - 1330
नोटा - 10906
एकूण मतमोजणी - 73007
मतमोजणीची आकरावी चौदावी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -52507, बाळा नाडार -1240,मनोज नाईक - 748, मीना खेडेकर - 1190, फरहान सय्यद - 897, मिलिंद कांबळे - 519, राजेश त्रिपाठी - 1291
नोटा - 10284
एकूण - 68676
मतमोजणीची तेरीवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -48015, बाळा नाडार -1151,मनोज नाईक - 708, मीना खेडेकर - 1156,फरहा न सय्यद - 859, मिलिंद कांबळे - 499, राजेश त्रिपाठी - 1211
नोटा - 9547
एकूण मतमोजणी - 63146
मतमोजणीची आकरावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -42343, बाळा नाडार -1052,मनोज नाईक - 622, मीना खेडेकर - 948,फरहा न सय्यद - 753,मिलिंद कां बळे - 455,राजेश त्रिपाठी - 1067
नोटा - 8379
एकूण - 55619
मतमोजणीची दहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -37469, बाळा नाडार -975,मनो ज नाईक - 584, मीना खेडेकर - 898,फ रहान सय्यद - 720,मि लिंद कांबळे - 428, राजेश त्रिपाठी - 986
नोटा - 7556
एकूण - 49616
मतमोजणीची नववी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -32515, बाळा नाडार -897,मनोज नाईक - 543 , मीना खेडेकर - 863, फरहान सय्यद - 667, मिलिंद कांबळे - 409, राजेश त्रिपाठी - 889
नोटा - 6637
एकूण मतमोजणी - 43420
मतमोजणीची आठवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -29033, बाळा नाडार -819,मनोज नाईक - 458,मी ना खेडेकर - 789, फरहान सय्यद - 628, मिलिंद कांबळे - 358, राजेश त्रिपाठी - 787
नोटा - 5655
एकूण मतमोजणी - 38527
मतमोजणीची सातवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके -24955, बाळा नाडार -733,मनोज नाईक - 416, मीना खेडेकर - 646,फरहा न सय्यद - 545, मिलिंद कांबळे - 312, राजेश त्रिपाठी - 679
नोटा - 4712
एकूण मतमोजणी - 32998
मतमोजणीची सहावी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके - 21090, बाळा नाडार -674, मनोज नाईक - 398, मीना खेडेकर - 587, फरहान सय्यद - 448, मिलिंद कांबळे - 291, राजेश त्रिपाठी - 621
नोटा - 4338
एकूण - 28447
मतमोजणीची पाचवी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके - 17278, बाळा नडार - 570,मनोज नाईक - 365,मी ना खेडेकर - 516, फरहान सय्यद - 378, मिलिंद कांबळे - 267, राजेश त्रिपाठी - 538
नोटा - 3859
एकूण - 23771
मतमोजणीची चौथी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके - 14648, बाळा नडार - 505, मनोज नाईक - 332, मीना खेडेकर - 437, फरहान सय्यद - 308, मिलिंद कांबळे - 246, राजेश त्रिपाठी - 492
नोटा - 3580
एकूण - 20548
मतमोजणीची तिसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके - 11361, बाळा नडार - 432,मनोज नाईक - 207,मीना खेडेकर - 2 81, फरहान सय्यद - 232, मिलिंद कांबळे - 202, राजेश त्रिपाठी - 410
नोटा - 2967
एकूण - 16092
मतमोजणीची दुसरी फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके - 7817, बाळा नडार -339,मनोज नाईक -113 ,मीना खेडेकर -1 85,फरहान सय्यद -154, मिलिंद कांबळे - 136, राजेश त्रिपाठी - 223
नोटा -1470
एकूण -10437
मतमोजणीची पहिली फेरी (उमेदवार निहाय मतदान)
ऋतुजा लटके- 4277, बाला नाडार - 222,मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138,फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127
नोटा -622
एकूण मत : 5624
एखाद्या विधानसभा पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान मिळण्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. दरम्यान, नोटाला मिळालेल्या मतदानावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंधेरीमध्ये नोटाला मिळालेले मतदान हे भाजपचे असल्याचा दावा केला आहे. तर नोटाला मतदान ही स्थानिकांची भावना असावी असे भाजपने म्हटले आहे.