Aditya Thackeray On Andheri Bypoll Result: अंधेरीच्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल- आदित्य ठाकरे
अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result 2022 ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Ramesh Latke) विजयी झाल्या. या विजयामुळे ठाकरे गटात जल्लोशाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray On Andheri Bypoll Result) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result 2022 ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Ramesh Latke) विजयी झाल्या. या विजयामुळे ठाकरे गटात जल्लोशाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray On Andheri Bypoll Result) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे ( (Aditya Thackeray) यांनी 'या विजयातून (अंधेरी) निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल', अशी भावना व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, 'आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे. (हेही वाचा, Andheri Bypoll Result 2022: उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष, ऋतुजा लटके यांचा 58,775 मतांनी विजय)
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा एकहाती विजय
ऋतुजा लटके यांनी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत 66 हजार 247 मतं मिळवली. धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यभर नोटाचीही चर्चा आहे.
ट्विट
उमेदवार निहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे
- ऋतुजा लटके- 66,247
- नोटा- 12,776
- बाळा नडार- 1506
एखाद्या विधानसभा पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान मिळण्याची राज्यातील बहुदा ही पहिलीच घटना असावी. दरम्यान, नोटाला मिळालेल्या मतदानावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अंधेरीमध्ये नोटाला मिळालेले मतदान हे भाजपचे असल्याचा दावा केला आहे. तर नोटाला मतदान ही स्थानिकांची भावना असावी असे भाजपने म्हटले आहे
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)