Amruta Fadnavis blackmail case: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणाला वेगळं वळण, अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत अनिल जयसिंघानीची हायकोर्टात धाव

अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

Anil Jaisinghani (Photo Credit: PTI)

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणात आता मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, संशयित अनिल जयसिंघानीने (Anil Jaisinghani) आपल्या विरोधातील एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने याचिकेत केली आहे. अनिल जयसिंघानीला पोलिसांनी गुजरातहून (Gujarat) मोठा सापला रचून अटक केली होती. (Raj Thackeray: राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अजामीनपात्र वॉरंट रद्द)

अमृता फडणवीस यांनी त्यांना 1 कोटी रुपयाची लाच देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आल्याची तक्रार मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी तसेच त्याचे नातेवाईक निर्मल जयसिंघानी यांना 20 मार्च रोजी गुजरात येथून अटक करण्यात आली होती.

मात्र हा आरोप पूर्णपणे चुकीचा असून या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले असल्याचे सांगत ही अटक बेकायदेशीर असल्याचे अनिल जयसिंघानी यांचे वकील मनन संघई यांनी मुंबईत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. कायद्यातील तरतुदींनुसार, अटक केल्यापासून 24तासांच्या आत कोर्टासमोर हजर न करणे तसेच आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात विलंब करणे तसेच पोलिसांनी सीआरपीसीतील तरतुदींचं पालन न करणे यावरून आरोपींबाबत पूर्वग्रह असल्याचे दर्शवते. अनिल जयसिंघानी याला अटकेच्या 36  तासानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आले होते.

अनिल जयसिंघानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. 20 मार्च रोजी अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी डी आलमाले यांच्यासमोर हजर करण्यात आलं.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif