Amravati Crime: अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूने वार; आरोपी अटकेत
भरचौकात अमरावतीत दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Amravati Crime: अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भरचौकात दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला (Knife Attack)केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल काळकर असे २४ वर्षीय आरोपीचे नाव आहे. अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमधील ही घटना आहे. या घटनेमुळे अमरावती शहर हादरले आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तेव्हा तरूणी कॉलेजला निघाली होती. आरोपीने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला आसपासच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर तरुणीच्या गळ्याला ६ टाके पडले आहेत. (हेही वाचा: Yashashree Shinde Murder Case : यशश्री शिंदे खून प्रकरणी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी; पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय)
आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तो सतत तरुणीचा पाठलाग करायचा आणि तिचा रस्ता आडवायचा. आज सकाळी देखील तरुणी कॉलेजला निघाली होती त्यावेळी आरोपी तरुण प्रफुल्ल काळकरने तिचा पाठलाग केला आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे त्याठिकाणी असलेले रिक्षावाले मदतीसाठी धावून आहे. (हेही वाचा: Human Trafficking And Prostitution Mumbai: मुंबई येथील वेश्याव्यवसाय दलालास मानवी तस्करी प्रकणात 10 वर्षांचा तुरुंगवास)
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रफुल्लला रिक्षाचालकांनी पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला अमरावती शहरातील राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. यापूर्वी सुद्धा तरुणीच्या आई वडिलांनी आरोपीची पोलिसात तक्रार केली होती.
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2024 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

