Lockdown in Maharashtra: लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असल्याने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाबाबत अनेक राजकीय नेत्यांमध्ये मतभेद सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊनमुले गेल्या वर्षापासून अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहेत. दरम्यान, बेरोजगारीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे लॉकडाऊन आमचा विरोध आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
'राज्यातील आर्थिक स्थिती पाहता आता हा लॉकडाऊन लोकांना सुद्धा मान्य नाही, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत जर, लॉकडाऊन लागले तर आम्ही त्याचा विरोध नक्की करणार आहोत. नियम कडक करा, पण लॉकडाऊन महाराष्ट्रात कुठेच मान्य नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाऊनचा फटका गोर गरिबांना बसत आहे. महत्वाचे म्हणजे, रिक्षाचालक यांनी ईएमआयवर रिक्षा खरेदी केल्या आहेत. तर, व्यापाऱ्यांनी आपले इलेक्ट्रिक बिल कसे भरावे?' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद; उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घेण्याचं केलं आवाहन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित केले होते. राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने लॉकडाऊन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे? यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.